द्राक्षाच्या काडी पक्वतेवर लक्ष द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्राक्षाच्या काडी पक्वतेवर लक्ष द्या
द्राक्षाच्या काडी पक्वतेवर लक्ष द्या

द्राक्षाच्या काडी पक्वतेवर लक्ष द्या

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ११ : ‘‘सशक्त घड निर्मितीसाठी ऑक्टोबर छाटणीपर्यंत द्राक्ष वेलीच्या पानांवर व काडीवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ देऊ नका. पान व देठ परीक्षण करून संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनुसार काडी पक्वतेवर लक्ष केंद्रित करा. सशक्त घड निर्मितीसाठी कीड, रोग व खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे,’’ असा सल्ला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिला.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यलय पुणे, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या वतीने नारायणगाव येथे द्राक्ष निर्यात विषयक क्षमता वृद्धी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात डॉ. सोमकुंवर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर हे होते. या कार्यशाळेत वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. सहदेव रामटेके यांनी संजीवक व कॅनोपी व्यवस्थापन या विषयावर, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दीपेंद्र एस. यादव यांनी कीड नियंत्रण या विषयावर, डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी द्राक्ष बागेतील रोग नियंत्रण या विषयावर, द्राक्ष तज्ज्ञ मंगेश भास्कर यांनी विषमुक्त द्राक्ष उत्पादन या विषयावर मार्गदर्शन केले.
या वेळी कृषी पणन मंडळाचे विभागीय उपसरव्यवस्थापक राजेंद्र महाजन, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंगेश भास्कर, द्राक्ष उत्पादक गुलाबराव नेहरकर, मारुती बोरचटे, शशिकांत थोरात, महादेव वाघ, बाबाजी नेहरकर, ऋषिकेश मेहेर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे मृदा तज्ज्ञ डॉ. अजय उपाध्याय म्हणाले, ‘‘चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्याचे योग्य मात्रेत शोषण होण्यासाठी शेणखतासोबत सल्फर पावडर आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये जिप्समचा वापर करणे गरजेचे आहे. परिणामी द्राक्षवेल सशक्त, निरोगी व रोग आणि किडींना कमी बळी पडेल.’’
अनंत सावरकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन केव्हीकेचे शास्रज्ञ योगेश यादव, राहुल घाडगे, वैभव शिंदे, धनेश पडवळ यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01389 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..