नारायणगावातील कॅफे चालकांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणगावातील कॅफे चालकांवर गुन्हा
नारायणगावातील कॅफे चालकांवर गुन्हा

नारायणगावातील कॅफे चालकांवर गुन्हा

sakal_logo
By

नारायणगाव, ता. २४ : नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिसांनी केलेल्या कॅफेच्या तपासणीत पडदे लावून विभागणी केलेल्या जागेत बारावी इयत्तेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले-मुली एकांतात बसून असभ्य वर्तन व अश्लील चाळे करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी दोन कॅफे चालकांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील बहुतेक महाविद्यालयाच्या परिसरात कॅफे सुरू झाली आहेत. त्यात महाविद्यालयीन तरुण-तरुणींना निवांतपणे गप्पा मारता येतील, असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यवस्था केली आहे. त्यामुळे कॅफेत जाण्याकडे तरुण-तरुणींचा कल वाढला आहे. जुन्नर येथील एका कॅफेतील बंदिस्त खोलीत असणाऱ्या कप्प्यात अश्लील चाळे करणारी मुले-मुली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना शुक्रवारी आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी कॅफे चालकावर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक रमेश हांडे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात केली.
याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन नारायणगाव पोलिसांनी नारायणगाव येथील महाविद्यालयातील शिक्षकांना बरोबर घेऊन दोन कॅफेची तपासणी केली. त्यावेळी कॅफेत बारावी इयत्तेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले-मुली एकांतात बसून असभ्य वर्तन व अश्लील चाळे करत असल्याचे आढळून आले.
याबाबत पोलिस कर्मचारी सुवर्णा श्रीकांत गडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी वारूळवाडी येथील कॉलेज रस्त्यालगत असलेल्या ‘मुनलाईट कॅफे’चे मालक विशाल संदीप पवार (वय २०, रा. पाटे-खैरे मळा, नारायणगाव) व नारायणगाव शहरातील ‘कॅफे क्रीम’चे मालक समर्थ कालिदास सरवदे (वय २१, रा. खोडद रस्ता, नारायणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही कॅफेचे परवाने रद्द करावेत, याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकारी मंचर यांना पाठवण्यात येणार आहे, असे ताटे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01408 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..