बलात्कारातील आरोपी नऊ वर्षानंतर जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्कारातील आरोपी
नऊ वर्षानंतर जेरबंद
बलात्कारातील आरोपी नऊ वर्षानंतर जेरबंद

बलात्कारातील आरोपी नऊ वर्षानंतर जेरबंद

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १ : आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मागील नऊ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सापळा रचून अटक केली. अमोल ऊर्फ सुजित बबन ऊर्फ कोंडीभाऊ सोनवणे (वय ३४, रा. चाळकवाडी), असे त्यांचे नाव आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी माहिती दिली की, अमोल याने लग्नाचे आमिष दाखवून आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणी आरोपीवर सन २०१३ मध्ये नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी फरारी झाला होता. तो चाकण (ता. खेड) व भूगाव (ता. मुळशी) भागात नाव बदलून राहत वास्तव्य करत होता. तो चाळकवाडी येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दीपक साबळे यांना मिळाली होती. त्यानुसार अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी त्याला चाळकवाडी येथील टोलनाक्यावर सापळा लावून अटक केली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, गणेश जगदाळे, दीपक साबळे, राजू मोमीन, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, मुकेश कदम या पथकाने केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01420 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..