पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय 
पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

sakal_logo
By

नारायणगाव, ता.६ : नारायणगाव परिसरात आज (ता. ६) सायंकाळी चारनंतर ढगांचा गडगडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.
नारायणगाव, येडगाव भागात ३१ ऑगस्ट रोजी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला. येडगाव धरण परिसरात १५५ मिलिमीटर तर नारायणगाव, आर्वी, गुंजाळवाडी परिसरात १०१ मिलिमीटर पाऊस झाला होता. पुन्हा आज सायंकाळी चार नंतर ढगांचा गडगडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाला. त्या नंतर ही पाऊस सुरू होता. सततच्या पावसामुळे बागायती व खरीप पिके धोक्यात आली आहेत. खते, औषधे यांचे वाढलेले भाव व शेती पिकांचे मोठया प्रमाणात झालेले नुकसान या दुहेरी संकटात बळिराजा सापडला आहे. केवळ आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या मदतीबाबत शासन कोणताही ठोस निर्णय घेत नाही.या मुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, तालुक्यातील शेतकरी द्राक्ष बागांच्या छाटणीच्या तयारीत आहे. छाटणी पूर्व द्राक्ष वेलीची पानगळ होण्यासाठी शेतकऱ्यांनी इथ्रिलची फवारणी केली आहे. सततच्या पावसामुळे छाटणीचे नियोजन कोलमडले आहे, अशी माहिती जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर, गुलाबराव नेहेरकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01432 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..