दुचाकीचोराला दोन वर्षे कारावासाची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीचोराला दोन वर्षे कारावासाची शिक्षा
दुचाकीचोराला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

दुचाकीचोराला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

sakal_logo
By

नारायणगाव, ता. २३ : दुचाकीचोराला जुन्नर न्यायालयाने दोन वर्षे साधा कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस साधा कारावास अशी शिक्षा ठोठावल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. भाऊ वाल्मीक पथवे असे शिक्षा झालेल्या चोराचे नाव आहे. या बाबत सहायक पोलिस निरीक्षक ताटे म्हणाले की आरोपी नगर जिल्ह्यातील आहे. तो सराईत मोटारसायकलचोर आहे. भाऊ पथवे याने २ ऑगस्ट २०२१ रोजी गणेश पांडुरंग पाटे (रा. नारायणवाडी, ता. जुन्नर जि. पुणे) यांची मोटारसायकल चोरली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या प्रकरणी भाऊ पथवे याला पोलिसांनी अटक केली. त्याला २२ सप्टेंबर २०२२ रोजी जुन्नर न्यायालयात हजार केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायदंडाधिकारी विशाल घोरपडे यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01469 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..