श्रीराम पतसंस्थेचा कारभार पारदर्शक : हांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीराम पतसंस्थेचा कारभार पारदर्शक : हांडे
श्रीराम पतसंस्थेचा कारभार पारदर्शक : हांडे

श्रीराम पतसंस्थेचा कारभार पारदर्शक : हांडे

sakal_logo
By

नारायणगाव, ता.९ : ''''माजी आमदार वल्लभ बेनके यांनी स्थापन केलेल्या श्रीराम पतसंस्थेचा कारभार पारदर्शक व सभासदांच्या हिताचा असल्याने या पतसंस्थेबाबत लोकामध्ये आपुलकीची भावना आहे.''''असे मत तसेच मराठी बाणाचे निर्माते अशोक हांडे यांनी व्यक्त केले.
सभासदांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने श्रीराम पतसंस्थेच्या वतीने सुमारे सात हजार सभासदांना किराणा किटचे व पंधरा टक्के लाभांशाचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पतसंस्थेच्या उंब्रज नं.१ शाखेत झालेल्या कार्यक्रमात आमदार अतुल बेनके व मराठी बाणाचे निर्माते अशोक हांडे यांच्या हस्ते किराणा वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी हांडे यांनी पतसंस्थेच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले.
या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे, उपाध्यक्ष सुनील श्रीवत, ज्येष्ठ संचालक राजश्री बेनके, अमित बेनके, शशिकांत वाजगे, अनिल थोरात, यल्लू लोखंडे, विजय घोगरे, अनिल डेरे, ज्ञानेश्वर रासणे, नवनाथ चौगुले, अमीर तांबोळी, शीला मांडे, सीताराम पाटे आदी उपस्थित होते.
पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे यांनी सांगितले, की किराणा किटमध्ये दोन किलो साखर, मैदा, रवा, बेसन पी आदी वस्तू आहेत. यामुळे सभासदांची दिवाळी गोड होणार आहे. संस्थेकडे १७० कोटी रुपयांच्या ठेवी असून १३४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. पतसंस्थेने ३०४ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला आहे.

संस्थेने सुरू केलेल्या श्रीराम उत्सव ठेव योजने अंतर्गत सर्व-साधारण व्यक्तीस ९ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ९.५ टक्के व्याजदर देण्यात येत आहे. दरमहा सोनेतारण कर्ज व्याजदर ०. ७५ टक्के करण्यात आला आहे. संस्थेला ऑडिट अ वर्ग मिळाला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश नलावडे व शाखा अधिकारी अमोल औटी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
....................................
02943