कोल्हे मळा येथे बिबट्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हे मळा येथे बिबट्या जेरबंद
कोल्हे मळा येथे बिबट्या जेरबंद

कोल्हे मळा येथे बिबट्या जेरबंद

sakal_logo
By

नारायणगाव, ता.१ : येथील कोल्हे मळा (ता. जुन्नर) शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (ता.१) पहाटे चारच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. त्यास मणिकडोह येथील निवारा केंद्रात दाखल केले आहे. या बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले करून परिसरात दहशत निर्माण केली होती.
बिबट्याने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी येथील सुनील दत्तात्रेय कोल्हे यांचे वासरू जखमी झाले होते. त्यानंतर जुन्नर वनविभागाने अरुण कोल्हे यांच्या उसाच्या शेतात पिंजरा लावला होता. भक्ष्य म्हणून पिंजऱ्यात कोंबडी ठेवली होती. मागील पंधरा दिवस बिबट्या वनविभागाला चकवा देत होता. मात्र, आज पहाटे कोंबडी खाण्याच्या प्रयत्नात असलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. या भागात अजून दोन बिबटे वास्तव्यास असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वारूळवाडी येथील गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर आवारात व परिसरात १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान वनविभागाने तीन दिवसांत तीन बिबटे पकडले होते.

03017