जयहिंद अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयहिंद अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
जयहिंद अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

जयहिंद अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ५ : कुरण (ता. जुन्नर) येथील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सव्वीस विद्यार्थ्यांना दि. इंडिया बुल्स फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने ७ लाख १८ हजार रुपयांची शिष्यवृती मंजूर करण्यात आली आहे. शिष्यवृतीमुळे गरीब कुटुंबातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत झाली आहे, अशी माहिती जयहिंदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी दिली.
शिष्यवृती प्राप्त विद्यार्थी (कंसात शिष्यवृती रक्कम रुपये) : प्रथमेश महेंद्र पापडे (४८, ७५०), आदित्य गणपत वाघ (४८, ७५०) , साहिल राजेंद्र साठे (४८, ७५०), अक्षय प्रथमेश हिंगे (४८, ०००), अक्षदा सुनील बांगर (२७, ८७५), साक्षी दत्तात्रेय गुंड (२७, ८७५), सुजाता बापू नेहरकर (२७, ८७५), सायली लक्ष्मण पादिर (२७, ८७५), रुतुजा गणेश दांगट
(२७, ६७५), कल्याणी अशोक वाघ (२७, १२५), स्वप्नील साहेबराव पोखरकर (२६, ८७५), अक्षय देविदास शेरकर
(२६, ८७५) , चंद्रकला गणेश डहाके (२६, ८४३), विजय सुधीर पवार (२०, ६७५), सौरभ रवींद्र लबडे (३, ७५१) काजल बापूसाहेब घोलप (१, ८४२), सुशिल पांडुरंग ढगे (४५, ०००), ज्ञानेश्वर शांताराम महाकाळ (२१, ८७५), भूषण गोविंद डुंबरे (२७, ८७५), करिष्मा राजेंद्र लोहोटे (१९, ८७५), पुनम दत्तात्रेय नायकोडी (२१, ८७५), सुदय दिलीप नलावडे (२०, ५७५), रेणुका प्रभाकर डोंगरे (२०, ८७५), फिजा नासिर चौगुले (२७, ६६०), स्नेहा प्रदिप खताळ (२७, ८७५), अंकिता सदानंद मंडलिक (१७, १२५).
विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इंडिया बुल्स फाउंडेशनचे सीएसआर एक्झिकेटिव्ह राकेश चाळके यांनी मार्गदर्शन केले. जयहिंद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष आंद्रे यांनी पाठपुरावा केला. संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. डी. जे गरकळ यांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.