पक्षीय राजकारण विकासाला मारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षीय राजकारण विकासाला मारक
पक्षीय राजकारण विकासाला मारक

पक्षीय राजकारण विकासाला मारक

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १० : ‘‘पक्ष व पक्षीय राजकारण करत असताना वरच्या पातळीवर होणारी ओढाताण विकासाला मारक आहे. निवडणुकीनंतर पक्षीय राजकारण मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. निवडणूक नसताना पक्षीय राजकारण, भेदाभेद बाजूला ठेवून आपल्या माणसांच्या सर्वंकष विकासाचा विचार करून काम केल्यास विकासाचे स्वप्न साकारता येईल,’’ असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार अतुल बेनके, भाजपच्या नेत्या आशा बुचके, सरपंच योगेश पाटे, युवा नेते अमित बेनके, दिलीप कोल्हे, उपसरपंच आरिफ आतार यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी उपस्थित होते. रामदास अभंग यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी खासदार कोल्हे म्हणाले, ‘‘जुन्नर हा पर्यटन तालुका आहे म्हणून नुसता ढोल वाजवून पर्यटक येणार नाहीत. पर्यटकांसाठी सुनियोजित पायाभूत सुविधा निर्माण करून ‘डे टुरिझम’चे रूपांतर ‘स्टे टुरिझम’मध्ये होणे आवश्यक आहे. त्यासाठी आमदार बेनके व मी प्रयत्न करत आहे. प्रकल्प होत असताना सुनियोजित विकास करणे आवश्यक आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेतली असून, चर्चा केली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. संपूर्ण देशामध्ये शिरूर हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे की, ज्या ठिकाणी नॅशनल हायवेच्या रस्त्यांसाठी तीस हजार कोटी रुपयांचा निधी गडकरी यांनी मंजूर केला आहे.’’
या वेळी आमदार बेनके म्हणाले, ‘‘विकास कामे करत असताना काही लोक स्वहित साधतात. बोलतात तसे करत नाहीत. राजकारण, समाजकारण करत असताना नीतिमत्ता, चारित्र्य सांभाळणे आवश्यक आहे.’’

‘...तर जाहीर माफी मागेल’
‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील पंचवीस वर्षात खेड येथील कांदा लसूण संशोधन केंद्र या राष्ट्रीय प्रकल्पानंतर जुन्नर येथे होणारा वनौषधी हा एकमेव राष्ट्रीय प्रकल्प आहे. चाकण येथे होणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प अस्तित्वात येणार आहे. त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करून बैठक झाली आहे. राज्याचा दौरा करत असताना जुन्नर व शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्ते हे राज्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत चांगले आहेत. तसे न आढळल्यास मी पुढील कार्यक्रमात जाहीर माफी मागेल,’’ असे आशा बुचके यांना उद्देशून अमोल कोल्हे केले.