माझ्या नाराजीच्या चर्चा निराधार : कोल्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझ्या नाराजीच्या चर्चा निराधार : कोल्हे
माझ्या नाराजीच्या चर्चा निराधार : कोल्हे

माझ्या नाराजीच्या चर्चा निराधार : कोल्हे

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ११ : ‘‘कसली नाराजी? मी नाराज नाही. दंत उपचार सुरू असल्याने शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित राहता आले नाही. याबाबतची माहिती मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली होती. त्यामुळे मी नाराज असण्याचे कारण नाही. सुरू असलेल्या चर्चा निराधार आहेत,’’ अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
खासदार कोल्हे यांनी चित्रपटाच्या प्रमोशनप्रसंगी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. त्यानंतर चार नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनास त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यानच्या काळात पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प, चाकण येथे होणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, या चर्चेकडे त्यांनी दुर्लक्ष करून कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. ते नुकतेच जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘पक्षीय राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित असावे. निवडणुकीनंतर पक्षीय राजकारण, भेदाभेद बाजूला ठेवून आपल्या माणसांच्या सर्वंकष विकासाचा विचार करून सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकासाचे स्वप्न साकारता येईल. देशातील पहिला ब्रॉडगेज रेल्वे असलेला पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प शिरूर लोकसभा मतदारसंघाची भाग्यरेषा बदलणारा आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मी पाठपुरावा केला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागा उपलब्ध करून दिलेला चाकण येथे होणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प अस्तित्वात येणार आहे. याबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेतली. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, हिरवा कंदील दाखवला आहे.