फरारी आरोपीस गुजरातमधून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फरारी आरोपीस गुजरातमधून अटक
फरारी आरोपीस गुजरातमधून अटक

फरारी आरोपीस गुजरातमधून अटक

sakal_logo
By

नारायणगाव, ता.१३ : जमिनीच्या व जुन्या भांडणाच्या वादातून कावळ पिंपरी (ता.जुन्नर) येथील रोहिदास बाबूराव पाबळे (वय ३९) याचा पिस्तुलाचा वापर करून निर्घृणपणे खून करून मागील सात महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला गुजरात राज्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला जुन्नर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण व नारायणगाव पोलिस यांनी केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या प्रकरणी मन्ना ऊर्फ सुरज हर्जित सिंग (वय २३ , रा. हरदोचक बांम्बा, मंदीर म्हाथ्रा भागी तर्न, तरन पंजाब) याला गुजरात येथून अटक केली आहे.
नऊ मार्च २०२२ रोजी कावळ पिंपरी (ता.जुन्नर) येथील रोहिदास पाबळे याचा सात जणांनी कोयते, तलवारी तसेच पिस्तुलाच्या साहाय्याने पाबळे यांचे मानेवर, डोक्यावर, पोटावर, पाठीवर मारून निर्घृणपणे खून केला होता. या पैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र मन्ना ऊर्फ सूरज हर्जित सिंग हा फरार होता. तो गुजरात राज्यात वेषांतर करून एका कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. पोलिसांनी सापळा लावून त्याला गुजरात येथून अटक केली.