दुचाकी चोरट्याला दोन तासांत अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी चोरट्याला 
दोन तासांत अटक
दुचाकी चोरट्याला दोन तासांत अटक

दुचाकी चोरट्याला दोन तासांत अटक

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १४ : नारायणगाव (ता. जुन्नर) येथून चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा नारायणगाव पोलिसांनी शिताफीने तपास करून दोन तासांत संगमनेर (जि. नगर) येथील चोरट्यास अटक करून त्याच्याकडून मोटारसायकलही ताब्यात घेतली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या प्रकरणी राहुल लहानू बर्डे (वय १८, सध्या रा. हिवरेतर्फे नारायणगाव, ता. जुन्नर; मूळ रा. आश्वी, ता. संगमनेर) याला अटक केली आहे. त्याने १२ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास नारायणगाव येथील औषध विक्रेते अजय रामचंद्र चोरडिया यांची दुचाकी घरासमोरून चोरून नेली होती. त्यांनी याबाबतची माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने नाकेबंदी करून तपास सुरू केला. नारायणगाव बसस्थानकातून आरोपी राहुल बर्डे याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक ताटे यांनी दिली.