ट्रॉलीखाली सापडून विवाहितेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रॉलीखाली सापडून
विवाहितेचा मृत्यू
ट्रॉलीखाली सापडून विवाहितेचा मृत्यू

ट्रॉलीखाली सापडून विवाहितेचा मृत्यू

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १४ : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्त्यावर उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून बावीस वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात विद्या रमेश कानसकर (वय २२, रा. दौंडकरवाडी-निमदरी, ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला.
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी माहिती दिली की, हा अपघात सोमवारी (ता. १४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील भागेश्वर दूध उत्पादक संस्थेसमोर झाला. रमेश कानसकर, विमल धनंजय जाधव व विद्या कानसकर हे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्त्याने जात असताना समोरून उसाची वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली आल्याने विद्या कानसकर या दुचाकीवरून खाली उतरल्या. दरम्यान, भागेश्वर दूध उत्पादक संस्थेसमोर ट्रॉलीचा धक्का लागून त्या खाली पडल्या. त्यावेळी ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.