सत्ताधारी शिक्षक संघ पॅनेलचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ताधारी शिक्षक संघ पॅनेलचा विजय
सत्ताधारी शिक्षक संघ पॅनेलचा विजय

सत्ताधारी शिक्षक संघ पॅनेलचा विजय

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १५ : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या सरळ लढतीत सत्ताधारी शिक्षक संघ पॅनेलचे सतरापैकी पंधरा उमेदवार निवडून आले. विरोधी स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले.
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना सप्टेंबर १९२३ मध्ये झाली असून, पतसंस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे १७० कोटी रुपयांची आहे. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विजय लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघ पॅनेल; तर विजय रामचंद्र कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी परिवर्तन पॅनेल तयार केला होता. संचालक मंडळाच्या सतरा जागांसाठी चौतीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दोन्ही पॅनेलने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. निवडणूक प्रचारात आर्थिक व्यवहारासंदर्भात आरोप प्रत्यारोप झाले होते.
नारायणगाव येथील गुरुवर्य रा. प. सबनीस कनिष्ठ महाविद्यालयात मतदान प्रक्रिया झाली. १ हजार ९८ पैकी १ हजार ६९ मतदारांनी (९७.३५ टक्के) मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीलेश धोंगडे यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचा सत्कार पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे व जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विकास मटाले, सभापती संदीप थोरात राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर, संजय डुंबरे उपसभापती आशा धांबोरी यांच्या हस्ते झाला.

विजयी उमेदवार
शिक्षक संघ पॅनेल : नानाभाऊ तात्याबा कणसे, अनिल गोविंद कुटे, ज्ञानदेव चिंतामण गवारी, पूनम पद्माकर तांबे, संतोष मनोहर पाडेकर, सचिन गीताराम मुळे, जितेंद्र बाळू मोरे, दिलीप काळूराम लोहकरे, रवींद्र तानाजी वाजगे, अंबादास ज्ञानेश्वर वामन, अविनाश श्रीपत शिंगोटे, विजय मुरलीधर लोखंडे, सविता नितीन कुऱ्हाडे, सुनीता राजू वामन, दत्तात्रेय उमाजी घोडे.
स्वाभिमानी परिवर्तन पॅनेल : विजय रामचंद्र कुऱ्हाडे, बाळू बुधाजी लांघी.