तंबाखूला पैसे न दिल्याने मुलाकडून आईचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंबाखूला पैसे न दिल्याने
मुलाकडून आईचा खून
तंबाखूला पैसे न दिल्याने मुलाकडून आईचा खून

तंबाखूला पैसे न दिल्याने मुलाकडून आईचा खून

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १५ : तंबाखू खाण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने आईच्या डोक्यात खोरे घालून खून केला. ही घटना मंगळवारी (ता. १५) दुपारी शिरोलीतर्फे आळे (ता. जुन्नर) येथे घडली. या प्रकरणी आरोपीला रात्री अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
आई अंजनाबाई बारकू खिल्लारी (वय ६०, रा. शिरोलीतर्फे आळे) यांचा खून केल्या प्रकरणी मुलगा अमोल बारकू खिल्लारी (वय २३) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद आरोपीचे वडील बारकू सखाराम खिलारी (वय ६६) यांनी दिली.
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक ताटे यांनी माहिती दिली की, मंगळवारी दुपारी दीड ते तीनच्या दरम्यान आरोपी अमोल याने आईकडे तंबाखूसाठी पैशाची मागणी केली. त्यावर, ‘माझ्याकडे पैसे नाहीत,’ असे आई अंजनाबाई यांनी सांगितले. या वेळी अमोल याने, ‘मी घर सोडून जाईल,’ अशी धमकी आईला दिली. त्यावर आईने, ‘तुला कुठे जायचे जा,’ असे म्हटल्यावर रागात येऊन अमोल याने घरातील खोरे आईच्या डोक्यात मारले. वर्मी घाव बसल्याने अंजनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. नारायणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आरोपीला अटक केली.