अर्धांगवायू केंद्र ग्रामीण रुग्णांना उपयोगी ठरेल : बेनके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धांगवायू केंद्र ग्रामीण रुग्णांना उपयोगी ठरेल : बेनके
अर्धांगवायू केंद्र ग्रामीण रुग्णांना उपयोगी ठरेल : बेनके

अर्धांगवायू केंद्र ग्रामीण रुग्णांना उपयोगी ठरेल : बेनके

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १७ : अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शशिकांत थोरात मागील २० वर्षापासून थोरात अँक्सिडेंट हॉस्पिटलच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील रुग्णांची सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करतात. त्यांच्या अत्यावश्यक सेवेमुळे अनेक अपघातग्रस्तांना जीवदान मिळाले. डॉ. थोरात यांनी सुरू केलेले पँरालिसीस रिहॅबिलिटेशन, लकवा, अर्धांगवायू केंद्र ग्रामीण भागातील रुग्णांना उपयोगी ठरेल, असे मत युवा अमित बेनके यांनी व्यक्त केले. थोरात ॲक्सिडेंट हॉस्पिटलच्या वतीने मोफत पॅरालिसीस रिहॅबिलिटेशन, लकवा अर्धांगवायू तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्‌घाटन युवा नेते अमित बेनके, सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
शिबिरात लकवा, अर्धांगवायू झालेल्या सुमारे २०० रुग्णांची तपासणी करून ११० रुग्णावर उपचार करण्यात आले. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शशिकांत थोरात, डॉ. विठ्ठल आहेर, डॉ.अजित वलवणकर, डॉ. गणेश देवकर, डॉ. शिवानी थोरात, डॉ. प्रथमेश थोरात, डॉ. हेमंत वेलकर, डॉ. रितुल ठोकाणे, डॉ.श्याम वेलकर, डॉ.हेमंत वेलकर आदींनी रुग्णांची तपासणी केली.
या वेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डॉ. सदानंद राऊत, डॉ. शशिकांत गुळवे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. हनुमंत भोसले, उपसरपंच आरिफ आतार, सदस्य गणेश पाटे, संतोष दांगट, सुजित खैरे, अनिल खैरे आदी उपस्थित होते.
डॉ. थोरात म्हणाले, ‘‘गतिमान जीवन शैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. व्यायामाचा अभाव, प्रदूषण, भेसळयुक्त अन्न, मानसिक ताण-तणाव यामुळे अर्धांगवायूचे प्रमाण वाढले आहे. तातडीने योग्य उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्ववत होऊ शकतो. ग्रामीण भागात परालिसीस रिहॅबिलिटेशन, लकवा अर्धांगवायू उपचार केंद्र सुरू केल्याने रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे.’’