हिवरेतर्फे नारायणगावच्या शेतकऱ्याचा रोहित्र दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवरेतर्फे नारायणगावच्या शेतकऱ्याचा रोहित्र दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा
हिवरेतर्फे नारायणगावच्या शेतकऱ्याचा रोहित्र दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा

हिवरेतर्फे नारायणगावच्या शेतकऱ्याचा रोहित्र दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

नारायणगाव, ता.१९ : नारायणगाव व मंचर वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीस नकार दिल्याने हिवरे तर्फे नारायणगाव येथील रमेश कोल्हे या शेतकऱ्याने टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. २१ नोव्हेंबर पूर्वी वीज वितरण कंपनीने ट्रान्सफार्मर दुरुस्त न केल्यास वीज वितरण कंपनीच्या निषेधार्थ मी २२ नोव्हेंबर रोजी टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
रोहित्राबाबत कोल्हे म्हणाले, की बाजारभावाचा अभाव, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मागील चार वर्ष द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याने २७ एकरमधील द्राक्ष बाग मी तोडून टाकली आहे. हिवरेतर्फे नारायणगाव हद्दीतील रोहित्र सहा नोव्हेंबरला नादुरुस्त झाला आहे. वीजपुरवठ्या अभावी रोहित्रावरील आठ शेतकऱ्यांचे कृषी पंप बंद आहेत. यामुळे रब्बी पिकांची पेरणीची कामे थांबली आहेत. नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करावा. यासाठी नारायणगाव व मंचर वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, रोहित्र दुरुस्त करण्यास ते चालढकल करत आहेत.

थकबाकीची वीस टक्के रक्कम व चालू तिमाही वीज बिल भरल्यास वीजपुरवठा सुरू करता येईल. मात्र शेतकरी वीज बिल भरण्यास नकार देत आहेत. हिवरे तर्फे तर्फे नारायणगाव येथील रमेश कोल्हे व इतर सात शेतकऱ्यांची दोन वर्षे वीज बिलाची थकबाकी आहे. किमान चालू वीज बिल भरल्यास रोहित्र दुरुस्त केली जाईल.
सिद्धार्थ सोनवणे (उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी नारायणगाव ):