येडगाव धरणात बुडून 
५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

येडगाव धरणात बुडून ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नारायणगाव, ता. १८ : येडगाव (ता. जुन्नर) धरणाच्या जलाशयात इशान अखिल कढी (रा. पंढरीनगर, हांडेवाडी चौक, पुणे) या पाच वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दोनच्या सुमारास घडली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
याबाबत ताटे म्हणाले, ‘‘आळेफाटा (ता. जुन्नर) येथील डॉ. राजेंद्र श्यामराव धांडे यांच्या समवेत पुण्यातील अखिल भरतकुमार कढी व त्यांचे तीन मित्र सहकुटुंब आज दुपारी दोनच्या सुमारास येडगाव धरण जलाशयाजवळ फिरण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर अखिल हे मुलगा इशान याला खांद्यावर घेऊन जलाशयात उतरले. दरम्यान, अंदाज न आल्याने खडकावरून त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. या वेळी इशान पाण्यात पडून बुडून खोल वाहत गेला. धरण परिसरात मासेमारी करणाऱ्या तरुणांनी सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर इशानला बाहेर काढले. दरम्यान नारायणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com