नारायणगाव ते शिवनेरी दरम्यान रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणगाव ते शिवनेरी दरम्यान रॅली
नारायणगाव ते शिवनेरी दरम्यान रॅली

नारायणगाव ते शिवनेरी दरम्यान रॅली

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १९ : शिवजयंतीनिमित्त नारायणगाव ते किल्ले शिवनेरी दरम्यान शिवनेरी ॲथलेटिक्स सोसायटी शिवजन्मभूमी यांच्या वतीने सायकल फेरी तर सावित्रीबाई फुले महिला विकास संस्थेच्या वतीने मोटर सायकल फेरीचे आयोजन केले होते. सायकल फेरीत साडेसातशे सायकलस्वार तर मोटर सायकल फेरीत तीनशे मोटर सायकल स्वार सहभागी झाले होते. भगव्या साड्या व भगवे फेटे परिधान करून फेरीत सहभागी झालेल्या महिला लक्ष वेधून घेत होत्या. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
रविवारी (ता. १९) सकाळी सात वाजता नारायणगाव येथील राजा शिवछत्रपती महाद्वार पूर्व वेस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून सायकल व मोटार सायकल फेरीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी छत्रपती संभाजी राजे उपस्थित होते. शेवंताई पेट्रोल पंपाजवळ झालेल्या कार्यक्रमांत सावित्रीबाई फुले महिला विकास संस्थेच्या संस्थापिका राजश्री बोरकर, आकाश बोरकर, प्रियांका बोरकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजे यांचा सत्कार करण्यात आला. सायकल व मोटार सायकल फेरीचा समारोप किल्ले शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. युवा नेते अमित बेनके यांनी सायकल व मोटार सायकल रॅलीत सहभागी शिवभक्तांचे स्वागत केले. या वेळी शीतल ठुसे, रूपाली पाटे, शुभांगी फुलसुंदर, प्रगती नवले, पूनम वायकर, पुष्पा खैरे उपस्थित होते.