गुंजाळवाडी येथे बसविला शिवरायांचा पुतळा

गुंजाळवाडी येथे बसविला शिवरायांचा पुतळा

नारायणगाव, ता. २० : शिवजयंतीचे औचित्य साधून समस्त ग्रामस्थ गुंजाळवाडी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई व संघर्ष प्रतिष्ठान गुंजाळवाडी यांच्या वतीने गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने घागरी मिरवणूक, होमहवन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक, शिवजन्म सोहळा, शिवस्मारकाचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा, महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुंजाळवाडी येथील शिवाजी चौकात १९८६मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. ग्रामस्थ अनंत वसंतराव शिंदे यांनी सुमारे दहा लाख रुपये खर्च करून मेघडंबरीसह छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाच फुटी पुतळा लोकार्पण केला. राजस्थान येथील कारागिरांनी कलाकुसर असलेली मेघडंबरी साकारली आहे.
अनंत शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबद नरवीर पिलाजी गोळे यांचे १४ वे वंशज मारुती आबा गोळे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माऊली खंडागळे, सरपंच स्मिता बेलवटे, हरिभाऊ वायकर, सरपंच योगेश पाटे, विकास दरेकर, शांताराम ढवळे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील ढवळे, सुजित खैरे, सूरज वाजगे आदी उपस्थित होते. या वेळी शिवव्याख्याते प्रा. यशवंत बोऱ्हाडे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे नियोजन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गुंजाळवाडी, मुंबई व समस्त ग्रामस्थ गुंजाळवाडी, संघर्ष प्रतिष्ठान गुंजाळवाडी यांनी केले.सूत्रसंचालन सुनील ढवळे, राजेंद्र शिंदे, योगेश तोडकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com