Sun, April 2, 2023

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या
प्रशासकपदी मोरे यांची नियुक्ती
नारायणगाव ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी मोरे यांची नियुक्ती
Published on : 23 February 2023, 11:13 am
नारायणगाव, ता. २३ : नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व ग्रामपंचायत सदस्य यांची पाच वर्षांची मुदत पूर्ण झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के. बी. मोरे यांची नेमणूक केली आहे.
गुरुवारी (ता. २३) सकाळी विस्तार अधिकारी मोरे यांनी प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, माजी सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच आरिफ आतार, संतोष वाजगे आदी उपस्थित होते. या वेळी मोरे म्हणाले, ‘‘नारायणगाव ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे येथील पिण्याचे पाणी, स्वच्छता याकडे विशेष लक्ष दिले जाईल. ग्रामस्थांनी मार्चपूर्वी पाणी पट्टी व मालमत्ता कर भरून सहकार्य करावे.’’
या वेळी ग्रामविकास अधिकारी नाईकडे यांनी प्रशासक मोरे यांचे स्वागत केले.