करिअर घडविण्याच्या जिद्द आवश्‍यक

करिअर घडविण्याच्या जिद्द आवश्‍यक

नारायणगाव, ता.२४: ''''बुद्धिमत्ता, कौशल्य व कलागुण विकसित करा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकण्यासाठी व्यायाम करा. विद्यार्थी दशेतच आपल्या मधील सुप्त गुणांना योग्य वाव द्या. करिअर घडविण्याच्या दृष्टिने जिद्दीने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे,'''' असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहतीचे संचालक अमित बेनके यांनी व्यक्त केले.
कुरण(ता. जुन्नर) येथील जयहिंद शैक्षणिक संकुलाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बेनके ,शिवनेरभूषण विनायक खोत , माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या निमित्त जयहिंद संकुलामध्ये झालेल्या विविध क्रीडास्पर्धा व गुणदर्शन कार्यक्रमात जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयहिंद पॉलिटेक्निक, जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी व जयहिंद आय. टी. आय. मधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रा. सुभाष कुडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ होते. दरम्यान, शिवनेरभूषण विनायक खोत यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विकास दरेकर, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एस.गल्हे, प्राचार्य डॉ. डी.जे. गरकल, तंत्रनिकेतनचे प्राचार्य स्वप्नील पोखरकर, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. लीना पाठक, आय.टी.आय.चे प्राचार्य सुभाष आंद्रे सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. हेमंत महाजन यांनी सूत्रसंचालन केले.


आपण निसर्गाचे देणे लागतो. ग्लोबल वार्मिंगमधून बाहेर पडायचे असेल तर निसर्गाचे तसेच पशुपक्षांचेही संवर्धन केले पाहिजे. वृक्षारोपण करून आपल्याला पुढील पिढीला अनेक संकटांपासून वाचविता येईल. विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा.
- माजी सैनिक रमेश खरमाळे म्हणाले

03397

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com