
जुन्नरमधील रस्त्यांसाठी ५५ कोटींचा निधी
नारायणगाव, ता. १३ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ व महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२३-२४ अंतर्गत जुन्नर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी ५५ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ जिल्हा वार्षिक योजना (सर्व साधारण) व आशियायी विकास बँक अर्थसाहाय्य अंतर्गत दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यातील आठ रस्त्यांच्या कामांना २३ कोटी ७४ लाख १८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेले रस्ते व निधी पुढीलप्रमाणे : कुमशेत ते जुन्नर रस्ता सुधारणा करणे (१.९५० किलोमीटर) : १ कोटी ६४ लाख ९१ हजार रुपये. हिवरेतर्फे नारायणगाव ते सातपुडा रस्ता सुधारणा करणे (२.५७५ कि.मी.) : २ कोटी १५ लाख ६१ हजार रुपये. नवलेवाडी रस्ता सुधारणा करणे (३ कि.मी.) : २ कोटी ४५ लाख ५९ हजार रुपये. डोमेवाडी रस्ता (३ कि.मी) : २ कोटी ५७ लाख १२ हजार रुपये. कोंबरवाडी जाधववाडी रस्ता (५.७०० कि.मी.) : ५ कोटी ५७ लाख १३ हजार रुपये. मंगरूळ झाप रस्ता (३.३०० कि.मी.) : ३ कोटी ३ लाख २५ हजार रुपये. शिरोली बुद्रुक ते महाबरेवाडी रस्ता (३.६५० कि.मी.) : ३ कोटी १६ लाख ८९ हजार रुपये. प्र.जि.मा. ९ पारगावतर्फे आळे ते भागडी रस्ता (३.६०० कि.मी.) : ३ कोटी १४ लाख ४९ हजार रुपये.
महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२३-२४ अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी ३० कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेले रस्ते व निधी पुढीलप्रमाणे : नारायणगाव-खोडद रस्ता : १४ कोटी रुपये. धोलवड, उंब्रज-पिंपळवंडी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे : ५ कोटी रुपये. कावळखिंड तांबे ते बेलसर रस्ता : ३ कोटी रुपये. निमगिरी, तळेरान मढ रस्ता सुधारणा करणे. ३ कोटी ५ लाख रुपये. जळवंडी गाव ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे : ६० लाख रुपये. प्रजिमा- १ ते खटकाळे जोडरस्ता सुधारणा करणे : ८० लाख रुपये. खडकी भराडी आळे बोरी शिंगवे रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करणे : ३ कोटी रुपये. प्रजिमा-१ ते खैरे जोडरस्ता सुधारणा करणे : ५० लाख रुपये : ३० कोटी ४० लाख रुपये.