श्रमसंकार शिबिरातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रमसंकार शिबिरातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी
श्रमसंकार शिबिरातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी

श्रमसंकार शिबिरातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १६ : राष्ट्रीय सेवा योजना ही श्रमसंस्कार, संस्कारी व स्वयंपूर्ण पिढी घडविणारी कार्यशाळा आहे. श्रमसंकार शिबिराच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे,’ असे मत जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी व्यक्त केले.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना आणि जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय कुरण यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन वडगाव सहाणी येथे करण्यात आले होते.
शिबिराच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गुंजाळ बोलत होते.


या शिबिरांतर्गत सात दिवस वडगाव सहाणी ग्रामपंचायत परिसरात ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मतदार जागृती, लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण, त्याचप्रमाणे पाणी, माती परीक्षण, स्वच्छ भारत अभियान, वनराई बंधारा बांधकाम व ग्राम सर्वेक्षण आदी उपक्रम राबविण्यात आले.

या वेळी वडगाव सहाणीच्या सरपंच वैशाली तांबोळी, ग्रामस्थ मंगेश वाबळे, दीपाली तांबोळी, अरुण तांबोळी, सुनील शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

तांबोळी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणतानाच त्यांच्यामध्ये सामाजिक भान निर्माण करून समाज विकासामध्ये त्यांना सहभागी करून घेण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे.

शिबिराच्या यशस्वितेबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी प्राचार्य सुभाष आंद्रे, कोमल काळे, ओमकार थोरात, हर्षदा कुरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग शेळके यांनी केले. कार्यक्रमाधिकारी आर. ए. गाडेकर यांनी आभार मानले.
------------------------