अजिंक्यतारा संस्थेच्या अध्यक्षपदी गणेश वाजगे

अजिंक्यतारा संस्थेच्या अध्यक्षपदी गणेश वाजगे

नारायणगाव, ता. ३० : येथील अजिंक्यतारा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गणेश विलास वाजगे, उपाध्यक्षपदी पराग हांडे तर सचिवपदी अतुल आहेर यांची बिनविरोध निवड झाली.
पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सचिन सरसमकर यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी संचालक राजेश कोल्हे, सचिन सुर्वे, विशाल तिवारी, विकास फुलसुंदर, योगेश रासने, सचिन सरोदे, राहुल अडसरे, राहुल पापळ, अंजली वाजगे, वर्षा कोकणे, तज्ञ संचालकपदी ॲड. फरिदा मुलाणी, सरिता मावळे आदी उपस्थित होते.
यावेळी पतसंस्थेच्या सल्लागारपदी खासदार डॉ. अमोल कोल्हे, विलास वाजगे, हरिश्चंद्र नरसुडेसर, विक्रम भोर, रमेश चोरडिया, सागर भुजबळ ,भावेश डोंगरे यांची निवड केली. नवनिर्वाचित संचालक व पदाधिकारी यांचा सत्कार युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com