जयहिंद महाविद्यालयात संशोधन केंद्रास मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयहिंद महाविद्यालयात संशोधन केंद्रास मान्यता
जयहिंद महाविद्यालयात संशोधन केंद्रास मान्यता

जयहिंद महाविद्यालयात संशोधन केंद्रास मान्यता

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ११ : कुरण येथील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयाला मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या संशोधन केंद्रास मान्यता मिळाली आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्याने अभियांत्रिकी विभागात संशोधन करण्यास उत्सुक असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल यांनी दिली.
इलेक्ट्रॉनिक्स विभागाकरीता डॉ. वैशाली धेडे, डॉ. राहुल मुळजकर तर मेकॅनिकल विभागाकरीता डॉ. डी. एस. गल्हे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण भागातील तरूणांनी उच्च शिक्षणाच्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी केले आहे.