हिवरेतर्फे नारायणगावात
जुगार अड्ड्यावर छापा

हिवरेतर्फे नारायणगावात जुगार अड्ड्यावर छापा

नारायणगाव, ता. ११ : हिवरेतर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथे खंडोबा मंदिराच्या जवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोन आरोपी शासकीय नोकरीत आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. ताटे यांनी दिली.
याप्रकरणी भागचंद रबाजी रणदिवे, किसन रणदिवे, हिरामण रभाजी रणदिवे, प्रदीप हरिभाऊ रणदिवे (सर्व रा. हिवरेतर्फे नारायणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एक आरोपी हिवरेतर्फे नारायणगाव येथील माध्यमिक शाळेत शिपाई; तर दुसरा ग्रामपंचायतीमध्ये शिपाई आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com