सबनीस विद्यालयातील ९०१ विद्यार्थी उत्तीर्ण

सबनीस विद्यालयातील ९०१ विद्यार्थी उत्तीर्ण

नारायणगाव, ता. २६ : येथील गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा सरासरी निकाल ९४.२५ टक्के लागला. परीक्षा दिलेल्या ९५६ विद्यार्थ्यांपैकी ९०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ७२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. २२० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, अशी माहिती मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक यांनी दिली.

विज्ञान शाखेत पूजा रवींद्र पाटे (९० टक्के), सृष्टी राजेश जाधव (८८.८७ टक्के),अनुष्का नितीन निलख (८६ टक्के) यांनी उल्लेखनीय यश मिळविले. वाणिज्य शाखेत आर्या नीलेश सावंत (९४.३३ टक्के), प्रसाद पांडुरंग मुळे(९२.३३ टक्के), आविष्कार सुनील चाहेर (९२.१७ टक्के) यांनी यश संपादन मिळविले. कला शाखेत तन्वी भोर (७९.६७ टक्के), तेजश्री हुलगे (७४.६७ टक्के), राजेंद्र यादव (७३.८३ टक्के) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. व्यावसायिक शाखेत मानसी सोनवणे (७६ टक्के), स्वरूप भुजबळ (७४ टक्के), अभिजित दळवी (७३.३३ टक्के)यांनी उल्लेखनीय यश मिळविले. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपाध्यक्ष सुजित खैरे, डॉ. आनंद कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com