Wed, October 4, 2023

धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे संचालक मंडळ बिनविरोध
धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे संचालक मंडळ बिनविरोध
Published on : 28 May 2023, 8:59 am
नारायणगाव, ता. २८ : येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. तेरा संचालक बिनविरोध निवडू आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी दिली.
बिनविरोध निवड झालेले संचालक : प्रवीण गुलाबराव डेरे, मेहबूब नजामुद्दीन काझी, हेमंत शंकरराव कोल्हे, संजय वसंतराव देशमुख, सुभाष विष्णू दरंदाळे, हितेश विठ्ठलराव श्रीवत, एकनाथ बाबूराव तांबे, कैलास हरिभाऊ औटी, राजू अंबू लोखंडे, सारिका भागेश्वर डेरे, राजेंद्र भाऊसाहेब कोल्हे, संध्या बापूसाहेब गायकवाड, काशिनाथ केरभाऊ आल्हाट.
नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार पतसंस्थेचे माजी अध्यक्ष वसंतराव देशमुख, शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर औटी उपस्थित होते.