जुन्नरमधील ३८ शाळा ‘शंभर नंबरी’

जुन्नरमधील ३८ शाळा ‘शंभर नंबरी’

नारायणगाव, ता. २ : जुन्नर तालुक्यातील ९० माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल ९६.९४ टक्के लागला. परीक्षा दिलेल्या ५ हजार १६८ पैकी ५ हजार १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. २ हजार ७२६ मुलांपैकी २ हजार ६१४ मुले; तर २ हजार ४४२ मुलींपैकी २ हजार ३९६ मुली पास झाल्या. निकालात या वर्षीसुद्धा विद्यार्थिनींनीच बाजी मारली.
मागील वर्षी तालुक्याचा सरासरी निकाल ९७.५४ टक्के लागला होता. तालुक्यातील ३८ शाळांचे सरासरी निकाल १०० टक्के लागले. ४६ शाळांचा सरासरी निकाल नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लागला. सर्वात कमी ७८.५७ टक्के निकाल आदिवासी भागातील खटकाळे आश्रमशाळेचा लागला. १ हजार ६८२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. १ हजार ८२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तालुक्यात नव्वद माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी नारायणगाव येथील श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के लागला. उत्तीर्ण १४० विद्यार्थ्यांपैकी ११५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह; तर उर्वरित २५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, असे मुख्याध्यापिका अनघा जोशी यांनी सांगितले.
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा : अंजुमन हायस्कूल जुन्नर, छत्रपती विद्यालय येणेरे, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक, विघ्नहर विद्यालय ओझर, शिवनेरी विद्यालय धोलवड, आणे माळशेज विद्यालय मढ, श्री संत गाडगेबाबा महाराज विद्यालय ओतूर, सरस्वती विद्यालय उदापूर, शासकीय आश्रमशाळा अंजनावळे, श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव, न्यू इंग्लिश स्कूल खामुंडी, सावळेरामबुवा दांगट विद्यालय उंब्रज २, शासकीय आश्रमशाळा सोनावळे, गुरुगोविंद देव प्रशाळा बोरी, वीर सावरकर विद्यालय बल्लाळवाडी, ज्ञानदा कन्या विद्यालय नारायणगाव, शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हाण, ज्ञानदा विद्यालय मंगरूळ, शासकीय आश्रमशाळा सोमतवाडी, शितलेश्वर विद्यालय सीतेवाडी, श्री समर्थ मधुकरराव विद्यालय चिंचोली (काशीद), न्यू इंग्लिश स्कूल हिवरे खुर्द, कुलस्वामी खंडेराय विद्यालय वडज, न्यू इंग्लिश स्कूल धामणखेल, न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी, न्यू इंग्लिश स्कूल अंबोली, शिवछत्रपती विद्यालय आळेफाटा, श्री जगदंबा विद्यालय जाधववाडी, अजित पवार विद्यालय खडखुबे, जे. आर. गुंजाळ इंग्लिश स्कूल आळेफाटा, शेठ रतनचंद मुथा इंग्लिश स्कूल जुन्नर, शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश स्कूल जुन्नर, कपर्दिकेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ओतूर, हांडे देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल आळेफाटा, विद्यानिकेतन पी. एम. हायस्कूल साकोरी, प्रा. रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल निवृत्तीनगर, हिरा इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर.

इतर शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे : शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर : ९८.३९, चैतन्य विद्यालय ओतूर :९७.८५, गुरुवर्य रा. प.सबनीस विद्यालय नारायणगाव : ९७.८२, सुभाष विद्या मंदिर पिंपळवंडी : ९६.३६, विद्या विकास मंदिर राजुरी : ९८.४१, सरदार पटेल विद्यालय आणे :९४.२०, ज्ञानमंदिर विद्यालय आळे : ९७.३२, श्री संभाजी विद्यालय बोरी : ९८.२७, श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज : ९६.३४, बेल्हेश्वर विद्यालय बेल्हे : ९५.६२, अण्णासाहेब आवटे विद्यालय जुन्नर : ९१.९५,
कृष्णराव मुंढे विद्यालय जुन्नर : ९३.३३, एम. जी. हायस्कूल आळे : ९८.४१, हिंदमाता विद्यालय कांदळी : ९४.८०, श्री ब्राह्मनाथ विद्यालय पारुंडे : ९०.७६, पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावा : ९६.३८, सद्गुरू एस. एम. विद्यालय पिंपरी पेंढार : ९७.९१, श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव बस्ती : ९८.३६, पुष्पावती विद्यालय डिंगोरे : ९५.१६, संत तुकाराम विद्यालय निरगुडे : ९७.५६, शिवनेर विद्यालय आर्वी : ८६.२७, महात्मा फुले विद्यालय खोडद : ९७.७७, संत गाडगे महाराज शासकीय आश्रमशाळा ओतूर : ८८.८८, शासकीय आश्रमशाळा खिरेश्वर : ९३.१८, न्यू इंग्लिश स्कूल आपटाळे : ९१.८६, शासकीय आश्रमशाळा तळेरान : ९४.११, शासकीय आश्रमशाळा आणे : ९५.८३, आर. बी. देवकर विद्यालय वडगाव आनंद : ९७.६६, इंदिरा गांधी विद्यालय रानमळा : ९०, येडेश्वर विद्यालय येडगाव : ९५.२३, न्यू इंग्लिश स्कूल निमदरी : ९५.४५, सावित्रीबाई फुले विद्यालय ओतूर : ९६.७७, शासकीय आश्रमशाळा खटकाळे- ७८.५७, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तांबे : ९६.७७, आदिमाया शक्ती विद्यालय इंगळूण : ९७.१४, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव : ९६.६६, न्यू इंग्लिश स्कूल राजूर : ८५.७१, शिवांजली विद्यालय चाळकवाडी : ९०, संत गाडगेबाबा महाराज विद्यानिकेतन पिंपळगाव जोगे : ९८.०७, श्री लेण्याद्री विद्यालय बल्लाळवाडी : ९७.०७, श्री कुलस्वामी खंडेराय विद्यालय हिवरेतर्फे नारायणगाव : ९६.०७, शासकीय आश्रमशाळा जुन्नर : ९२.८५, अजित पवार विद्यालय घाटघर : ८८.८८, अजित पवार विद्यालय देवळे : ८३.३४, ग्रामोन्नती मंडळ माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी : ९५.१२, न्यू इंग्लिश स्कूल कांदळी (नगदवाडी) : ९६, ज्ञानदा विद्यालय गोद्रे : ९४.३३, माध्यमिक शाळा आलमे : ८०, शासकीय आश्रमशाळा कोळवाडी : ७८.७८, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल जुन्नर : ९८.२४.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com