कुरण वनक्षेत्रात प्लॅस्टिक मुक्त जंगल अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरण वनक्षेत्रात प्लॅस्टिक मुक्त जंगल अभियान
कुरण वनक्षेत्रात प्लॅस्टिक मुक्त जंगल अभियान

कुरण वनक्षेत्रात प्लॅस्टिक मुक्त जंगल अभियान

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ७ : कुरण (ता. जुन्नर) येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने कुरण वनक्षेत्रात प्लॅस्टिक मुक्त जंगल अभियान राबविण्यात आले.या अभियानात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या २६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सुमारे तीनशे किलोग्रॅम प्लॅस्टिक कचरा जमा केला.
शाळा, महाविद्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे प्लॅस्टिक प्रदूषणाने ग्रस्त आहेत.त्याचबरोबर वने आणि अभयारण्ये सुद्धा प्लॅस्टिक प्रदूषणापासून अलिप्त नाहीत. प्लॅस्टिक विघटनशील नसल्याने प्लॅस्टिक कचरा ही एक सामाजिक समस्या बनली आहे.
जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. यामुळे वनपरिक्षेत्रात प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या आदि कचरा एक समस्या निर्माण झाली आहे. प्लॅस्टिकमुळे सजीव सृष्टी व पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असतो.प्लॅस्टिकचे दुष्परिणाम आणि पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेऊन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाने प्लॅस्टिक मुक्त जंगल अभियानाचे आयोजन केले होते.
जयहिंद अभियांत्रिकी महाविद्याल , राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग यांच्या वतीने व जुन्नर वनपरिक्षेत्र, वन विभाग यांच्या मार्गदर्शना खाली प्लास्टिक मुक्त जंगल अभियान" हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.या अभियानात वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, वन संरक्षक रमेश खरमाळे, वनपाल, वनरक्षक, जयहिंदचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालिका अंजली गुंजाळ, इंदुमती गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ, सुभाष आंद्रे हे सुद्धा सहभागी झाले होते.
अभियानाचे नियोजन प्रा. व्ही. जे.घोलप, स्थापत्य विभाग प्रमुख जी. एस.सुपेकर , कार्यक्रम अधिकारी आर. ए. गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आर. ए.गाडेकर यांनी केले.

03660