कोल्हेमळा येथे रास्ता रोको
नारायणगाव, ता. ७ : अष्टविनायक जोड प्रकल्पाअंतर्गत कोल्हेमळा येथील पुणे- नाशिक महामार्ग चौक ते ओझर फाटा दरम्यानच्या सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम तातडीने व्हावे, रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे पैसे द्यावेत, वाहतूक कोंडीतून पर्यटक व नागरिकांची सुटका करावी, या मागण्यांसाठी जुन्नर तालुका भाजपच्या वतीने कोल्हेमळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भाजप नेत्या आशा बुचके, तालुका अध्यक्ष संतोष खैरे, भाजप जुन्नर मध्य मंडल अध्यक्ष आशिष माळवदकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. ६) सायंकाळी रास्ता रोको करण्यात आले. यामुळे सुमारे अर्धा तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी महेंद्र कोल्हे, शिवाजी गायकवाड, अमित औटी, अक्षय डोके, अरुण कोल्हे, ॲड. केतन कावळे यांच्यासह तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आशा बुचके म्हणाल्या, ‘‘कोल्हेमळा येथील पुणे-नाशिक महामार्ग ते ओझर फाटा या रस्त्याचा उपयोग जुन्नर, विघ्नहर देवस्थान ओझर, विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे ये- जा करण्यासाठी केला जातो. येथे सतत वाहतूक कोंडी होत असते. चार वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूसंपादनासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे मंजूर काम मागील चार वर्षापासून प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे पैसे तत्काळ देऊन रस्त्याचे काम सुरू करावे.’’
यावेळी मागणीचे निवेदन बुचके यांच्या हस्ते नायब तहसीलदार अनंता गवारी, पोलिस उपनिरीक्षक जगदेव पाटील यांनी स्वीकारले.
07570
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

