किकवी सोसायटीवर ''कालभैरवनाथ''चे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किकवी सोसायटीवर ''कालभैरवनाथ''चे वर्चस्व
किकवी सोसायटीवर ''कालभैरवनाथ''चे वर्चस्व

किकवी सोसायटीवर ''कालभैरवनाथ''चे वर्चस्व

sakal_logo
By

नसरापूर, ता. ३० : किकवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निगडे व राजगड कारखान्याचे संचालक काँग्रेस कार्यकर्ते दत्तात्रेय भिलारे यांच्या नेतृत्वाखालील श्री कालभैरवनाथ पंचक्रोशी सहकार पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले. विरोधी वाघजाई माता पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही.
किकवी गावासह मोरवाडी, लोहकरेवाडी, पाचलिंग, राऊतवाडी, वाघजवाडी या पाच वाड्यांची मिळून किकवी सोसायटी आहे. याचे १११० मतदार सभासद आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले होते. मात्र, काही सभासदांनी नाराज होऊन बिनविरोधचा प्रस्ताव ठोकरला. त्यानंतर निगडे-भिलारे यांच्या नेतृत्वाखाली श्री कालभैरवनाथ पॅनेल व विरोधी वाघजाई माता पॅनेल यांच्यामध्ये १३ पैकी दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर ११ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये सर्वच्या सर्व ११ जागांवर कालभैरवनाथ पॅनेलने विजय संपादन केला.
निवडणुकीसाठी सरपंच नवनाथ कदम, सुभाष मोरे, नारायण मोरे, गणेश आवाळे, विजय मोरे, सुरेश आहिरे, किरण घारे, नारायण भिलारे, राहुल आहिरे, माऊली राऊत, गोरख मोरे व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोरचे उपनिबंधक बाळासाहेब तावरे व संस्थेच्या सचिव स्वाती आहिरे यांनी काम पाहिले.

कालभैरवनाथ पॅनेलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : अर्जुन आहिरे, बाळासाहेब आर्डे, नवनाथ भिलारे, गोपाल कोंढाळकर, अशोक मोरे, बाळासाहेब मोरे, चंद्रकांत पेटकर, राजेश निगडे, रेखा आहिरे, शालन मोरे, सुदाम जाधव. तर गुरुदास राऊत व हिम्मत कारळे हे बिनविरोध विजयी झाले आहेत.

02418

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01337 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top