देगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी बोरगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी बोरगे
देगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी बोरगे

देगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी बोरगे

sakal_logo
By

नसरापूर, ता. ६ : देगाव (ता. भोर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी करंदी खे.बा. येथील प्रदीप बोरगे यांची तर उपाध्यक्षपदी देगाव येथील सुशील यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. देगाव, नायगाव व करंदी खे.बा. या तीन गावांची एकत्रित देगाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक तीनही गावच्या ग्रामस्थांनी मिळून तेरा पैकी बारा जागा बिनविरोध केल्या.

बिनविरोध निवडीसाठी आबासाहेब यादव, तुळशीराम सावंत, अशोक शेलार, राजेंद्र सावंत, अरविंद बोरगे, तानाजी गोळे, आदित्य बोरगे, दिलीप कोंडे, आदिनाथ जगताप, प्रशांत यादव, शेखर यादव, बापू जगताप यांनी प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एम. डोके व संस्थेचे सचिव दिलीप खुडे यांनी काम पाहिले.

बिनविरोध निवड झालेले सदस्य
चंद्रशेखर यादव, सुशील यादव, विजय यादव, पंढरीनाथ जाधव, वासुदेव कोंडे, प्रदीप बोरगे, बाबासो गोळे, सुभाष खाटपे, दौलत खुडे, जयश्री ढेकाणे, संगीता गायकवाड, गणेश गोळे या संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01341 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top