सावरदरे शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरदरे शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान
सावरदरे शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान

सावरदरे शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान

sakal_logo
By

नसरापूर, ता. ४ ः सावरदरे (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त फडकवलेला राष्ट्रध्वज सुर्यास्तापुर्वी न उतरवता तब्बल तीन दिवस फडकत ठेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात इतर तीन शिक्षकांवर देखील ठपका ठेवण्यात आला आहे.

या बाबत माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ, पोलिस शिपाई योगेश राजीवडे यांना मंगळवारी (ता. ३) दुपारी तातडीने सावरदरे गावात पाठवले. या ठिकाणी पोलिसांनी दुपारी तीन वाजता योग्य सन्मानाने राष्ट्रध्वज उतरवला व ताब्यात घेतला.

याप्रकरणी पोलिस शिपाई योगेश राजीवडे यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांनी माहिती देताना सांगितले की, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सावरदरे च्या जिल्हा परिषद शाळेसमोर शाळेचे मुख्याध्यापक संजय भगवंत पापळ (रा. सासवड, ता. पुरंदर), शिक्षक प्रवीण खंडेराव नांदे (रा. आळंदे, ता.भोर), अमजद अब्बाद पटेल (रा. खंडाळा, जि. सातारा), शीतल कृष्णा टापरे (रा. खंडाळा, जि. सातारा) यांनी ग्रामपंचायत सदस्य पोपट किसन पापळ यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावला. ध्वजवंदनाच्या कार्यक्रमानंतर शासकीय नियमाप्रमाणे सदरचा राष्ट्रध्वज त्याच दिवशी सूर्यास्ताच्या अगोदर मानवंदना देऊन उतरवणे आवश्यक होते. शाळेतील शिक्षकांची ही जबाबदारी असताना सायंकाळी कोणीही ध्वजाकडे फिरकले नाही. दोन रात्र तीन दिवस ध्वज फडकत राहिला. हा राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याने मुख्याध्यापक संजय पापळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर तीन शिक्षकांनादेखिल या घटनेला जबाबदार धरण्यात आले आहे.

झेडपीकडून कारवाई होणार

याबाबत भोरच्या गटशिक्षणाधिकारी अश्वीनी सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, या घटने बाबत माहीती मिळाली असुन दाखल केलेल्या तक्रारी नुसार संबधीत शिक्षकांवर कारवाईसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01344 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top