हरिश्चंद्री फाट्यावर पादचारी गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरिश्चंद्री फाट्यावर पादचारी गंभीर जखमी
हरिश्चंद्री फाट्यावर पादचारी गंभीर जखमी

हरिश्चंद्री फाट्यावर पादचारी गंभीर जखमी

sakal_logo
By

नसरापूर, ता. ७ ःपुणे- सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावच्या हद्दीत रस्ता पार करणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव कारने ठोकरल्याने झालेल्या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
विजय अशोक काळे (वय २८, रा. कासुर्डी, ता. भोर) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास विजय काळे हे पायी महामार्ग ओलांडत असताना पुणे बाजुकडून सातारा बाजूकडे जाणाऱ्या कारने त्यांना ठोकर मारली. या बाबत जखमीचे भाऊ संजय काळे यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस नाईक नाना मदने करत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01349 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top