
दिवळे सोसायटीवर काँग्रेसचे वर्चस्व
नसरापूर, ता. ८ : दिवळे (ता. भोर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसने वर्चस्व मिळवले आहे. या सोसायटीच्या दोन जागा रिक्त राहिल्या असून, उर्वरित अकरा जागा बिनविरोध झाल्या. त्यात कॉंग्रेसच्या पॅनेलला ८; तर विरोधी पॅनेलला ३ जागा मिळाल्या.
या सोसायटीच्या निवडणुकीसाठी सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बाठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने सर्व अकरा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर विरोधी गटाकडून चार उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्यापूर्वी दोन्ही गटाचे सदस्य व ग्रामस्थांनी मिळून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सामंजस्यातून निर्णय घेतला. त्यात काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, तर विरोधी गटातील एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. त्यामुळे अकरा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात राहिले आणि निवडणूक बिनविरोध झाली.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाळासाहेब बाठे यांच्यासह पांडुरंग बाठे, माजी सरपंच संगीता बाठे, तुळशीराम बाठे, प्रकाश जगताप, सोमनाथ बाठे, गोविंद पांगारे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पवार व संस्थेचे सचिव संदीप चक्के यांनी काम पाहिले.
बिनविरोध निवडलेले संचालक
काँग्रेसच्या पॅनेलकडून पांडुरंग गोपाळ बाठे, वर्धमान रघुनाथ बाठे, विनोद भिकू पांगारे, गणपत नारायण पांगारे, दशरथ गुलाब बाठे, संगीता नथू पांगारे, सयाजी सोपान बाठे, मच्छिंद्रनाथ महादेव पांगारे; तर विरोधी गटाकडून सिंधूताई रामचंद्र पांगारे, गुलाब महादेव साळवे, सोमनाथ लक्ष्मण बाठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01350 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..