वेल्हे तालुक्यात अवैध माती उपसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेल्हे तालुक्यात अवैध माती उपसा
वेल्हे तालुक्यात अवैध माती उपसा

वेल्हे तालुक्यात अवैध माती उपसा

sakal_logo
By

नसरापूर, ता. ९ ः वेल्हे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या मातीचा उपसा चालू असून नियम डावलून रात्रीच्या वेळी मोठ्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते. तालुका तहसिल प्रशासनाला याबाबत विचारले असता आम्हाला
याबाबत माहिती नसल्याचे सांगत त्यांनी कानावर हात ठेवले आहेत.
वेल्हे तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये अनेक गावे आहेत. या ठिकाणी व तालुक्यात उत्खननाला परवानगी नाही. मात्र, अवैधरीत्या हजारो ब्रास मातीचे उत्खनन होऊन त्याची दहा चाकी ट्रकमधून राजरोसपणे वाहतूक चालू आहे. यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला असून, सततच्या माती उत्खननाने शेती देखिल धोक्यात आली आहे. या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परंतु, यापैकी काहीच प्रशासनाला दिसत नसून असे काही होतच नाही असे म्हणून वेल्हे तहसिल प्रशासन कानावर हात ठेवत आहे.
याबाबत वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता मी गेले पंधरा दिवसांपासून रजेवर असून त्या अगोदर माती उपसासाठी कोणतीही परवानगी दिली गेली नाही. त्यामुळे अवैध माती उपसाबाबत काही माहिती नाही. मी रजेवर गेल्यावर काही परवानगी दिली गेली असेल तर माहिती नाही असे त्यांनी सांगितले.

राजरोसपणे उत्खनन
वेल्हे तालुक्याच्या विविध भागात गेले चार ते पाच महिन्यापासून या मातीचे उत्खनन चालू असून शिवापूर ते सारोळा (ता. भोर) या महामार्ग पट्ट्यातील विटभट्टीसाठी तसेच उरुळी कांचन परिसरातील रोपवाटीकांसाठी या मातीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. दिवसा तुरळक होणारी ही वाहतूक सायंकाळनंतर राजरोसपणे केली जात आहे. पोलिस व महसूल प्रशासनास कोणतीच याबाबत माहिती नाही ही एक आश्चर्याची बाब असून याबाबत एकही कारवाई झालेली नसल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

...तर कारवाईच्या सूचना देणार
तहसीलदारांच्या रजेच्या कालावधीत काम पाहणारे नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे यांना याबाबत संपर्क केला असता वेल्हे तालुक्यात माती उपसा करण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे कोणतीही परवानगी दिली गेलेली नाही. मातीच्या अवैध
वाहतुकीबाबत देखिल काही माहिती नाही. त्यामुळे कारवाई झालेली नाही, अशी काही वाहतूक होत असेल तर माहिती घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या जातील असे त्यांनी सांगितले.


वेल्हे तालुक्यात जाण्यासाठी अवजड वाहतुकीसाठी नसरापूर वेल्हे हाच मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावरून या मातीची वाहतूक होते आहे. तसेच याच रस्त्यावरून वेल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी ये- जा करतात. मात्र त्यांना या रस्त्यावर चालणारी माती वाहतूक दिसत नाही, असे आश्चर्य व्यक्त आहे.
63101

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01352 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top