शिवरे येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवरे येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
शिवरे येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिवरे येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

नसरापूर, ता.९ : पुणे-सातारा महामार्गावर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस मागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ७ मे) घडली. ओळख पटलेली नसल्याने राजगड पोलिस दुचाकीस्वाराच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत.
शिवरे (ता. भोर) गावच्या हद्दीत शेल पंपासमोर पुण्याहून साताऱ्याकडे जाणारा दुचाकीस मागून आलेल्या वाहनाने ठोकर दिली दुचाकी चालक गंभीर जखमी झाला परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यास नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांची ओळख पटण्यासारखे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. या अपघातप्रकरणी बाबत सिद्धिविनायक हॉस्पिटल येथील कर्मचारी मंगेश सरपाले यांनी फिर्याद दिली. सदर मयत व्यक्तीच्या अंगावर निळा शर्ट काळी पॅन्ट असून उजव्या हाताच्या मनगटावर अजय नाव गोंदवले आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास राजगड पोलिस ठाणे क्र. ०२११३-२७२२३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

02447

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01353 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top