
नसरापूर येथे मिरवणूक
नसरापूर, ता. १४ : नसरापूर येथे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यचौकात छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी तरुणांनी संभाजीराजे यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढून अभिवादन केले.
नसरापूर येथे तरुणांच्या वतीने दरवर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते या वर्षी पासून रामनवमी उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती संभाजीराजे जयंती देखील साजरी करण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यचौकात भगव्या पताका लावून फुलांनी सजवलेल्या कमानीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा ठेवून त्याची पूजा करण्यात आली. यावेळी गावच्या सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, माजी सरपंच भरत शेटे, प्रकाश चाळेकर, विस्तार अधिकारी महेश दळवी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणराव शेटे, हनुमंत वाल्हेकर, सतीश वाल्हेकर, यशवंत कदम, मधुकर भोसले, करीम शेख, ग्रामपंचायत सदस्य इरफान मुलाणी, उत्तम निकम, अविनाश गयावळ, अनिल शेटे, ज्ञानेश्वर झोरे, माधव लोळे, गोरख धावले, रामचंद्र शेटे, गणेश पानसरे, सुजित माळी आदी उपस्थित होते.
यावेळी मच्छिंद्र महाराज कुंभार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली.
माजी सरपंच भरत शेटे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती बरोबरच दरवर्षी छत्रपती संभाजीराजे यांची जयंती साजरी करण्याचा नसरापूर ग्रामस्थांनी संकल्प केला. आज प्रतिमा पुजनाबरोबरच सायंकाळी संभाजी राजेंच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात येईल असे जाहीर केले. तसेच पुढील वर्षी शंभुजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचेही देखिल आयोजन केल्याची माहिती दिली.
Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01358 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..