
नवदांपत्याची 'मधू इथे आणि चंद्र तिथे' अशी झाली अवस्था
नसरापूर - अल्पवयीन मुलीशी लग्न करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. मुलीला पळवून नेऊन लग्न करून तो पोलिस ठाण्यात हजर झाला. परंतु मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार मागे न घेतल्याने पोलिसांनी कारवाई करत मुलीला सुधारगृहात तर मुलाची पोलिस कोठडीत रवानगी केल्याने नवदांपत्याची ''मधू इथे आणि चंद्र तिथे'' अशी अवस्था झाली.
वेल्ह्यातील एका सज्ञान युवकाने भोर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला एप्रिल महिन्यात पळवून नेले. याबाबत मुलीच्या आईने राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद दिली. परंतु लग्न करून आलेले हे जोडपे स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांच्या चौकशीत मुलीचे वय १७ वर्ष ८ महिने असल्याने ती अल्पवयीन ठरली. यामुळे मुलाविरुध्द अपहरणचा गुन्हा दाखल असल्याने पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले. यावेळी मुलीने तिच्या आई-वडिलांकडे जाण्यास नकार दिल्याने तिची बालसुधारगृहात रवानगी करण्याचा निर्णय घेतला तर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन बालविवाह केल्याने पॉस्को कायद्यांर्तगत संबंधित २६ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आर्थिक लालसेपोटी लग्नाचे वय नसतानाही अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न लावणाऱ्या विवाह संस्था,भटजी, व मदत करणाऱ्यावर देखील चौकशी करणार आहे.
- नितीन खामगळ, पोलिस निरीक्षक, राजगड पोलिस ठाणे
मुला-मुलींनी पळून जाऊन लग्न करताना आई वडिलांचा विचार करणे गरजेचे आहे. तो विचार होत नाही तसेच काही अल्पवयीन कायद्याचे पालन करत नाही. मात्र वय नसताना केलेल्या या धाडसाने त्यांना कायद्यानुसार कारवाईला तोंड द्यावे लागते.
- सचिन पाटील, पोलिस निरीक्षक, राजगड ठाणे
Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01362 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..