नसरापुरात वीजचोरीबद्दल ठेकेदाराला दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नसरापुरात वीजचोरीबद्दल ठेकेदाराला दंड
नसरापुरात वीजचोरीबद्दल ठेकेदाराला दंड

नसरापुरात वीजचोरीबद्दल ठेकेदाराला दंड

sakal_logo
By

नसरापूर, ता.२७ ः नसरापूर येथे रस्त्याच्या कामासाठी असलेली मशिनरी चालवण्यासाठी वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महावितरणने ठेकेदाराने वीजचोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले असून १७ हजार रुपये दंड केला आहे.

नसरापूर चेलाडी ते गावादरम्यान होत असलेल्या सिमेंट रस्त्याचे ठेकेदार जयदीप कोंडे हे वीज चोरी करत असल्याची तक्रार वीज वितरण कार्यालयात करण्यात आली होती. त्यावर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीजचोरीचे साहित्य जप्त करत ठेकेदार जयदीप कोंडे यांना नोटीस बजावत १७ हजार रुपये दंड वसुल केला आहे. वीज वितरण कंपनीचे उपअभियंता नवनाथ घोटुळे यांनी याबाबत सांगितले की, दक्ष नागरिकांमुळे ही वीज चोरी उघडकीस आली. पुन्हा असा चोरीचा प्रकार घडल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी समज ठेकेदाराला दिली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01376 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top