अखेर प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यात
अखेर प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यात

अखेर प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By

नसरापूर, ता.३१ : नागपूर महाराष्ट्राचा मुलगा व आग्रा उत्तर प्रदेशची मुलगी या सोशल मीडियामधून प्रेम फुललेल्या युगुलाचा आग्र्यावरुन पळून येऊन भिलारेवाडी (ता. भोर) येथे आसरा घेतला. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या आईवडीलांनी केलेल्या तक्रारीनुसार आग्रा उत्तरप्रदेश पोलिसांनी मोबाईलवरून तपास करत नसरापूर राजगड पोलिस ठाण्याच्या मदतीने प्रेमी युगुलाला ताब्यात घेतले. मोबाईलमुळे सुरू झालेले हे प्रेम प्रकरणाची अखेर मोबाईल मुळेच झाली.
ताजमहाल हे प्रेमाचे जगविख्यात प्रतीक असलेल्या आग्रा शहरातील अल्पवयीन मुलगी व दिलीप ऊर्फ रमेश दुधबरेय्या (वय २७) यांची मोबाईल वर पब्जी गेम खेळताना ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेत पळून जायचे ठरवले. दिलीप याने आग्रा रेल्वेस्टेशनला बोलावून तेथे जाऊन मुलीला घेऊन महाराष्ट्रात आला. पुणे येथे आल्यावर काम शोधताना त्यांना भोर तालुक्यातील भिलारेवाडी येथे रोजंदारीचे काम मिळाले. सुमारे दीड ते दोन महिने ते या ठिकाणी राहिले. दरम्यान मुलीच्या आई वडिलांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार तेथील शहागंज पोलिसांकडे केली. त्यांनी मुलीच्या फोन काँलवरुन दिलीपचा नंबर मिळवला व त्याच्या लोकेशनचा तपास सुरू केला. काही दिवसांनी त्यांना भोर तालुक्यातील लोकेशन मिळाले. तेथील पोलिस उपनिरीक्षक अरविंद तोमर, हवालदार अशिषकुमार यादव, महिला पोलिस कर्मचारी डॉली चौहान, व मुलीचे कुटुंबीय राजगड नसरापूर पोलिस ठाण्यात आले व त्यांना नसरापूरचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह फौजदार संजय सुतनासे, हवालदार शरद धेंडे, महेश खरात, महेश सूर्यवंशी, भागीरथ घुले यांनी सहकार्य करत दिलीप याच्या लोकेशन वरुन तपास करत नसरापूर जवळ भिलारेवाडी येथे जाऊन तेथे रोजंदारीचे काम करत राहणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01379 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top