बनेश्वर केसरी शर्यतीत धावले शंभर बैलगाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनेश्वर केसरी शर्यतीत धावले शंभर बैलगाडे
बनेश्वर केसरी शर्यतीत धावले शंभर बैलगाडे

बनेश्वर केसरी शर्यतीत धावले शंभर बैलगाडे

sakal_logo
By

नसरापूर, ता.४ : निधान सांगवी (ता. भोर) या छोट्याशा गावात बैलगाडा शर्यतीचा थरार नागरिकांनी अनुभवला. यात तब्बल शंभर बैलगाडे धावले. विजयी प्रथम पाच बैलगाडा विजेत्यांना मानाची चांदीच्या गदा व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. प्रवीण गोरख धावले युवमंचच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

शर्यतीमध्ये पुणे, सातारा तसेच इतर जिल्ह्यातून बैलगाडे सहभागी झाले होते. प्रथम ३१ हजार रुपये रोख व चांदीची गदा हे बक्षीस मुळशी तालुक्यातील मोहील धुमाळ व मनोज गोडे यांच्या बैलगाड्याने मिळवले. व्दितीय क्रमांकाचे २१ हजार रोख व चांदीची गदा हे बक्षीस निधान सांगवी येथील अक्षय धावले यांच्या बैलगाड्याने मिळवले, तृतीय क्रमांकाचे रोख ११ हजार रुपये व चांदीची गदा कोरेगाव येथील सानिका संकपाळ व भाऊसाहेब पवार यांच्या बैलगाड्याने पटकविली. चतुर्थ क्रमांकाचे रोख ७ हजार व चांदीची गदा हे बक्षीस कराड येथील कानेगाव येथील जाधव गुरुजी यांच्या जोडीने मिळविली. पाचव्या क्रमांकाचे रोख ५ हजार व चांदीची गदा उरुळी देवाची येथील सिद्धिविनायक ग्रुप यांच्या बैलगाड्याने मिळविली.

शर्यतीस शिवसेनेचे कुलदीप कोंडे, भाजप तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, माजी उपसभापती अमोल पांगारे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील, भाऊसाहेब झेंडे, राहुल वाल्हेकर, सदाशिव पांगारे, माळेगावचे सरपंच अमोल मोरे, अनिल शेटे आदी मान्यवरांनी भेटी दिली.
या स्पर्धेच्या अयोजनासाठी विष्णू धावले, हरिभाऊ धावले, ज्ञानोबा धावले, शिवाजी पांगारे यांनी शेत उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेच्या नियोजनासाठी युवामंचचे प्रवीण धावले, दत्तात्रेय धावले, रोहीत खुटवड, कैलास धावले, प्रशांत धावले, ओम धावले, लोकेश खुटवड, नवनाथ पांगारे, विकास निगडे, राहुल हजारे, शहाजी खंडाळकर, दीपक धावले, गणेश झेंडे, मयूर पांगारे, काका शेटे आदींनी प्रयत्न केले.


02501

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01383 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top