वरवेत होणार तीन कोटीची पाणी योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरवेत होणार तीन कोटीची पाणी योजना
वरवेत होणार तीन कोटीची पाणी योजना

वरवेत होणार तीन कोटीची पाणी योजना

sakal_logo
By

नसरापूर, ता.२२ : वरवे खुर्द (ता.भोर) येथे लवकरच जलजीवन मिशन अंतर्गत ३ कोटी १२ लाख ८८ हजाराची पाणी योजना होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी वरवे येथे बोलताना दिली.
वरवे येथे लोकसहभागातून होणाऱ्या राममंदिराचे भूमिपूजन शिवतरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वरवे खुर्द येथे ग्रामसचिवालय इमारतीसाठी १५ लाख तर कचरा व्यस्थापनसाठी घंटागाडी या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती देत भविष्यकाळात गावच्या विकासकामासाठी आणखी भरीव निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.

भूमिपूजनप्रसंगी जिल्हा नियोजनचे सदस्य विक्रम खुटवड,गणेश बागल, गणेश खुटवड, सरपंच नीलेश भोरडे, उपसरपंच आशिष भोरडे, महेंद्र भोरडे, सागर कोंडे, धनश्री गणौरे, मंदाकिनी काकडे, रोहिणी कांबळे, स्वप्नाली भोरडे, अनुराधा खोंडगे, माजी सरपंच हरिदास काळाने, धनेश डिंबळे, मोहन इंदलकर, पोपट चौधरी, गणेश सुतार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विक्रम खुटवड म्हणाले की, वर्वे गावच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून निधी आणणार असून जिल्हा नियोजन समितीमधून देखील भरीव निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. असे सांगून आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना संधी मिळणार आहे.

नामदार कै. खुटवड यांच्यामुळे गाव पाणीदार
वरवेचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भोरडे यांनी बोलताना शरद पवार यांचे सहकारी कै. काशिनाथराव खुटवड हे आमदार असताना त्यांनी दूरदृष्टी ठेवून वरवे गावच्या हद्दीत पाझर तलाव बांधला त्यामुळे वरवे हे पाणीदार गाव म्हणून ओळखले जात असल्याचे सांगून कै. खुटवड यांच्या आठवणींना उजाळा दिला.

02543

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01407 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top