
नसरापूर येथे बंद घरातून पावणेतीन लाखांची चोरी
नसरापूर, ता. २७ : नसरापूर (ता. भोर) येथील वनविहार बंगलो सोसायटीमधील एक बंद बंगल्याची खिडकी तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूंसह सुमारे पावणेतीन लाख रुपयांची चोरी केली.
या चोरीबाबत बंगल्याचे मालक अनिरुद्ध काशिनाथ कर्वे (वय ५९) यांनी फिर्याद दिली. ते १४ जून ते २२ जून या कालावधीत पत्नीसह पुण्याला मुलाकडे राहावयास गेले होते. २२ रोजी ते पुन्हा नसरापूर येथील घरी आल्यावर पाहिले असता त्यांच्या घराच्या खिडकीची लोखंडी जाळी काढून चोरट्यांनी आत प्रवेश करून घरामधील लोखंडी व लाकडी कपाटाची कुलपे तोडून त्यामधील पत्नीचे मंगळसूत्र व कानातले, असे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख पाच हजार रुपये, सोनी कंपनीचा एक कॅमेरा व टायटन कंपनीची तीन घड्याळे, असा मिळून २ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01411 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..