नसरापुरात साधेपणाने सामूहिक नमाजपठण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नसरापुरात साधेपणाने सामूहिक नमाजपठण
नसरापुरात साधेपणाने सामूहिक नमाजपठण

नसरापुरात साधेपणाने सामूहिक नमाजपठण

sakal_logo
By

नसरापूर, ता.१२ : आषाढी एकादशी व बकरी ईद सण एकत्र आल्याने नसरापूर येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदनिमित्त कुर्बानीचा कार्यक्रम रद्द केला. तसेच मशिदीमध्ये साधेपणाने नमाजपठण करून ईद उत्साहात साजरी केली.
बकरी ईदच्या निमित्ताने राजगड पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राजगड पोलिस ठाण्यात आयोजित केली होती. या बैठकीमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी आषाढी एकादशी व ईद एकत्र येत असल्याने सामाजिक सलोखा राखत हिंदूंच्या भावनांचा आदर करत ईदच्या दिवशी दिली जाणारी कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
मशिदीमध्ये मौलाना अब्दुलवाहीद सिद्दीकी यांनी मुस्लिम बांधवांना ईद बद्दल धार्मिक माहिती दिली. यानंतर सामूहिक नमाज पठन होऊन मुस्लिम बांधवांनी गळा भेट देत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी नसरापूर मज्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हनिफ शेख,उपाध्यक्ष बशिर मण्यार, सचिव इरफान मुलाणी, खजिनदार निसार शेख, राजू तांबोळी साजिद तांबोळी, जावेद शेख, जहाँगीर मुलाणी, लिहाझ शेख आझाद शेख, आदी मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.
अध्यक्ष हनिफ शेख यांनी माहिती देताना सांगितले कि, नसरापूर येथे हिंदू व मुस्लिम समाजामध्ये कायम सलोख्याचे वातावरण असते सर्व समाजाचे नागरिक एकत्र येऊन सण साजरे करतात या पार्श्वभूमीवर आजच्या आषाढी एकादशी च्या दिवशीच ईद सण आल्याने आम्ही सर्वांनी मिळून आजची कुर्बानी रद्द केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01424 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top