किकवी येथे रोटरीच्या वतीने ८०० देशी रोपांची लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किकवी येथे रोटरीच्या वतीने ८०० देशी रोपांची लागवड
किकवी येथे रोटरीच्या वतीने ८०० देशी रोपांची लागवड

किकवी येथे रोटरीच्या वतीने ८०० देशी रोपांची लागवड

sakal_logo
By

नसरापूर, ता. २० : रोटरी क्लब ऑफ भोर राजगड च्यावतीने किकवी, मोरवाडी (ता.भोर) परिसरात वनविभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात रोटरीचे सदस्य तसेच किकवी येथील माध्यमिक शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी वनविभाग तसेच रस्त्याच्या दुतर्फा ८०० देशी रोपांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपणप्रसंगी रोटरी क्लब ऑफ भोर राजगडच्या अध्यक्षा सुवर्णा मळेकर, सचिव रूपाली म्हेत्रे, वनाधिकारी नंदकिशोर पाटील, प्रकल्प संचालक विनय कुलकर्णी, रोटेरियन जयश्री शिंदे, निकम सर, वैशाली हर्णसकर, नंदा कोंढाळकर, राजकुमार शिंदे, जाधव, संपतराव मळेकर, सरपंच सविता पवार, किकवी माध्यमिक शाळेचे शिक्षक राजेंद्र मोरे, मिलिंद मगर, सागर भिलारे, विनोद राऊत व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, अध्यक्षा सुवर्णा मळेकर यांनी बोलताना रोटरीच्या उपक्रमांची माहिती दिली व उपक्रमांसाठी सहकार्य केलेल्या माध्यमिक शाळा किकवीचे विद्यार्थी, वनकर्मचारी व किकवी मोरवाडी ग्रामस्थांचे आभार मानले.

02584

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01431 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top