गोवा राज्यातील मद्यसाठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवा राज्यातील मद्यसाठा जप्त
गोवा राज्यातील मद्यसाठा जप्त

गोवा राज्यातील मद्यसाठा जप्त

sakal_logo
By

गोवा राज्यातील मद्यसाठा जप्त
३९ लाख १८ हजाराची दारू जप्त;राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाची कारवाई

नसरापूर, ता. १७ : गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेली विदेशी दारू व बियरचा सुमारे ३९ लाख १८ हजार रुपयांच्या मद्यसाठ्याची वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाने पुणे सातारा महामार्गावर सारोळा (ता. भोर) येथे पकडला. या प्रकरणी दोघांना अटक करत ट्रकसह सुमारे ४९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निरीक्षक पी. सी. शेलार राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे यांच्या पथकाने सातारा पुणे महामार्गावर सारोळा गावच्या हद्दीत उड्डाणपुलाच्या जवळ सापळा लावून मिळालेल्या माहितीच्या आधारे टाटा कंपनीचा ट्रक क्र.आर. जे. ३२ जीए ५९५६ थांबवून त्याची तपासणी केली. ट्रकमध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेल्या बियरचे ५०० मी.ली. चे ५० बाँक्स, व्हीस्कीचे ७५० मि.ली. चे १५० बाँक्स, मँकडाँल व्हीस्कीचे ७५० मी.ली.चे २५० बाँक्स, राँयल चँलेंजर्स व्हिस्कीचे ७५० मी.ली.चे ५० बाँक्स, जार व्हिस्कीचे ७५० मी.ली.चे ५० बाँक्स असा मिळून ३९ लाख १८ हजार रुपयांचा मद्यसाठा अढळून आला या बरोबर कुजलेली लोकर किंमत २ हजार रुपये, तीन मोबाईल फोन रुपये ५ हजार व वाहतूक करणारा ट्रक किंमत रुपये दहा लाख असा मिळून ४९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाई मध्ये ट्रक चालक सुरेशचंद्र कलाल वय ३६ रा. सियाल मांग्रीघाटी (ता. देवगड) जिल्हा राजसबंद व किसनलाल प्यारचंद खटीक वय २८ रा. धानेन (ता. कोमलगढ) जिल्हा राजसबंद यांना अटक केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01437 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top