नसरापूर येथे सराफावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नसरापूर येथे सराफावर गुन्हा दाखल
नसरापूर येथे सराफावर गुन्हा दाखल

नसरापूर येथे सराफावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

नसरापूर, ता. २४ : नसरापूर येथील सराफ बाबुसिंग चौहान व त्याच्या दोन मुलांवर सुमारे २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शाम शहाजी शेळके (वय २९, रा. कापुरव्होळ) यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. २०१८ मध्ये सराफ बाबुसिंग चौहान व त्यांचे मुलगे शैलेश व मंगेश यांनी त्यांच्या नावावर असलेली कार (क्र. एमएच १४ ईएच १००९) वर फायनान्स कंपनीचा बोजा असताना देखिल कर्ज नसल्याचे खोटे सांगून शेळके यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये घेऊन त्यांना विकली. त्यानंतर फायनान्स कंपनीने सदर वाहन हप्ते न भरल्याने जप्त केले. या बाबत बाबुसिंग यांना विचारले असता तुमची रक्कम देतो किंवा कार देतो असे सांगत गेले तीन साडेतीन वर्षे खोटे बोलले. प्रत्यक्षात कार किंवा पैसे काहीही न देता चौहान व त्याचे दोन मुलगे फरार झाले होते. त्यांनी २ लाख ६० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची शेळके यांनी तक्रार केली आहे. या आधीही तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान राजस्थान येथून बाबुसिंग व त्याचा मुलगा शैलेश चौहान याला अटक केल्यावरही त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याने न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडी सोमवारपर्यंत वाढवली.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01447 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..